राष्ट्रीयशैक्षणिक

शिरूर येथे महिला सबलीकरण व सक्षमीकरण’ विषयक एक दिवसीय कार्यशाळा

शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम -24) चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर येथे दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी ‘महिला सबलीकरण व सक्षमीकरण’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थिनी मंच, महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समिती, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि विद्यार्थी विकास मंडळ आणि यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ही कार्यशाळा विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरणासाठी आयोजित केली गेली आहे. समाजात महिलांची भूमिका सक्षम, सशक्त आणि सजग करण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतात. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते असतील. यावेळी उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव हे देखील विशेष उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात विद्यार्थिनींना ‘महिलांविषयक कायदे’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर सुप्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. सुप्रिया कोठारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांनी महिलांवरील अत्याचार, कार्यस्थळी लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा, घटस्फोट व वारसा हक्क यांसारख्या कायदेशीर मुद्द्यांवर विद्यार्थिनींसमोर विचार मांडणार आहे. या कार्यशाळेतील दुसरे सत्र ‘महिलांचे आरोग्य’ यावर केंद्रित असणार असून, शिरूर येथील हार्दे हॉस्पिटलच्या डॉ. सोनाली हार्दे विद्यार्थिनींना आरोग्य, पोषण, मानसिक स्वास्थ्य यावर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थिनींची BMI (Body Mass Index) तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर विद्यार्थिनींच्या शारीरिक आरोग्याविषयी त्यांना वैयक्तिकरित्या सल्ला दिला जाणार असून, योग्य आहार व व्यायाम यावर भर दिला जाईल.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढीस लागेल, स्वतःच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण होईल आणि त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ होईल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. हा कार्यक्रम महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी एक सशक्त व्यासपीठ ठरणार असून, समाजातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थिनी मंचच्या समन्वयक डॉ. के. एच. पैठणकर आणि महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समितीच्या समन्वयक डॉ. ए. डी. क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button