महाराष्ट्रविशेष

शिरूर तालुक्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान ‘महसूल सप्ताह’ महसूल विभागाच्या विविध उपक्रमांचे आयोजन

शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम -24 )शिरूर येथे १ ते ७ ऑगस्टदरम्यान ‘महसूल सप्ताह’ अंतर्गत महसूल विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.

                          त्यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत “महसूल सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याबरोबरच महसूली कामकाजाचा आढावा घेऊन विविध जनहितकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महसूल सप्ताहात महसूल कामे वेळेत पूर्ण करणे, अभिलेख अद्यावत करणे, वसूलीसाठी नोटिसा पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी यांसह उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल.
१ ऑगस्ट: “महसूल दिन” साजरा करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.२ ऑगस्ट रोजी उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी सन्मान व लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण; सन २०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना पात्र कुटुंबांना पट्टे वाटप करण्यात येईल.
३ ऑगस्ट रोजी पाणंद/शिवार रस्त्यांची मोजणी व दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ४ ऑगस्टला”छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” प्रत्येक मंडल निहाय राबविण्यात येणार आहे.

महसूल दिनानिमित्त जुन्नरचे तहसिलदार डॉ सुनील शेळके यांना सन्मानित करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

५ ऑगस्टला डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटीद्वारे थेट लाभ देणे व ७ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविणे, शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत निर्णय, एम सॅन्ड धोरणाची अंमलबजावणी आणि महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ होईल .
तहसिलदार म्हस्के यांनी सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button