निधन वृत्तविशेष

शिरूर मध्ये विजेचा करंट लागून महिला मृत्यूमुखी


शिरूर दिनांक( डेली न्यूज पोस्ट टीम )
शहरातील कामाठीपुरा भागातील मीना चंद्रशेखर गुप्ता (वय ४०) या महिलेचा वीजेचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ५ ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी मीना गुप्ता आपल्या राहत्या घरी नळाचे पाणी भरण्यासाठी मोटर चालू करत असताना विजेचा धक्का बसल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी प्रमोद चंद्रशेखर गुप्ता (वय २५, रा. कामाठीपुरा, शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हवा. राऊत (ब.नं. ३३००) करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button