क्राईम

घरफोडीत दोन लाख वीस हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

 

 शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम ) शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून २ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन
बाबुराव म्हाता गोरे (वय ३६, व्यवसाय शेती, रा. शिरसगाव काटा) यांनी फिर्याद दिली आहे. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून ५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजेदरम्यान त्यांच्या राहत्या घरातील दोन पत्र्याच्या पेट्या उचकून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरले.
चोरट्यांनी नेलेल्या दागिन्यांमध्ये –1 लाख रुपये किंमतीचे
(२ तोळे ५ ग्रॅम चे डोरले ),
अंदाजे १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या जुन्या काळातील 3 तोळे वजनाच्या सोन्याच्या पुतळ्या असा
एकूण २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ५६६/२०२५ भा.दं.वि. कलम ३०५ अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर कदम करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button