

शहरातील राम आळीतील समस्त नामदेव शिंपी समाज श्रीराम मंदिरात नामदेव शिंपी समाज यांचा वतीने रामजन्मसोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी श्रीरामच्या जयघोष करण्यात आला . नेवासा येथील ह. भ .प सदाशिव महाराज तोगे यांचे श्रीरामजन्मावर किर्तन झाले.श्रीराम जन्माचा पाळणा म्हणण्यात आल्या नंतर सुंटवठाचा प्रसादाचे वाटप करण्यात आले .
श्रीराम नवमी निमित्त राममंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली होती. विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरुर प्रखंड यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर ,समस्त नामदेव शिंपी समाजचे विवेक बगाडे ,सिध्देश्वर बगाडे ,राजू बोत्रे , नाना पाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . शहरातील शिवसेवा मंदिर , शनि मंदिर व रामलिंग मंदिर याठिकाणीही श्रीराम नवमीच्या कार्यक्रम पार पडला .
श्रीराम नवमी निमित्त राममंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली होती. विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरुर प्रखंड यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर ,समस्त नामदेव शिंपी समाजचे विवेक बगाडे ,सिध्देश्वर बगाडे ,राजू बोत्रे , नाना पाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . शहरातील शिवसेवा मंदिर , शनि मंदिर व रामलिंग मंदिर याठिकाणीही श्रीराम नवमीच्या कार्यक्रम पार पडला .फोटो ओळी
शिरुर शहरातील राम आळी तील श्रीराम मंदिरातील मुर्ती 


