Uncategorizedविशेषशैक्षणिक

२१ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी निवड

चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचे विद्यार्थी

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील एकवीस विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीमधे नोकरीसाठी निवड झाली आहे.
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान (रसायनशास्त्र ) वर्गातील एकवीस विद्यार्थ्यांची रांजणगाव पंचतारांकित एमआयडीसी मधील इटॉन या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे .
बोरा महाविद्यालयात कला , वाणिज्य विज्ञान सह संगणक व व्यवस्थापन या शाखातून विद्यार्थ्याना शिक्षण घेता येते .
यापूर्वी महाविद्यालयातील कॅम्पस इंटरव्हयू मधुन विद्यार्थ्यांची कंपन्या मध्ये निवड झालेली आहे.
विशेष म्हणजे तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या निकालापूर्वीच विद्यार्थ्यांच्या झालेल्या निवडीमुळे विद्यार्थ्यांसह पालकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडीबद्दल महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष उद्योजक प्रकाश धारिवाल, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, संस्थेचे सचिव नंदकुमार निकम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते आदीनी अभिनंदन केले आहे .
प्रथमेश खेडकर, गौरव सोनवणे, कृष्णा गाडे, आदित्य बोराटे, तेजस सालके , साहिल भाकरे , मानसी लोखंडे, धनश्री गोरे श्रेया भोसले, अश्विनी मोते, पूजा कोतकर स्वाती शेळके , रितू चेतराम, श्रुती कदम दिपाली गाडेकर , राधिका दाते, निकिता बोराडे , सृष्टी क्षीरसागर , भूमिका बोबडे ,प्रियंका आहेर या विद्यार्थ्यांची कंपनीत निवड झाली असल्याचे प्रा . डॉ . सतिशकुमार पाटील यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button