शिरूर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर आरक्षण कही खुशीतर कही गम

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) शिरुर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा आरक्षणा करीता शिरुर तहसिल कार्यालयात आरक्षण पदाची सोडत काढण्यात आली .
तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी यावेळी आरक्षण सोडत विषयी माहिती त्यांनी दिली . त्यांनी सांगितले की यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीचा सरपंच पदासाठीचे आरक्षण काढण्यात आले असून आज उरलेल्या ८९ ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात येत आहे .
माजी आमदार अशोक पवार यांचे गाव असणारे वडगाव रासाईचे सरपंचपद अनुसुचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखिव झाले .स्वर्गिय माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांची तर्डोबाचीवाडी ग्रामपंचायत चे सरपंचपद सर्वसाधारण महिलेकरीता राखिव झाले . भाजप नेत्या जयश्री पलांडे व माजी आमदार काकासाहेब पलांडे यांचे गाव असणारे मुखईचे सरपंचपद अनुसुचित जाती महिला प्रवर्गा करिता राखिव झाले
.औद्योगिक दृष्ट्या महत्वाची व जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे व माजी पंचायत समिती सभापती विश्वास कोहोकडे यांचे गाव असणारे कारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी राखिव झाले .कवठे येमाई , कान्हूर मेसाई चे सरपंचपद ओबीसी करीता राखिव झाले .शिरुर ग्रामीण , रांजणगाव गणपती, टाकळी हाजी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारणपदाकरीता आहे .
अनुसुचित जाती महिला प्रवर्गा करीता
– निमगाव म्हाळुंगी , मुखई , जांबूत ,वढू बुदृक
अनूसुचित जाती -आमदाबाद , गोलेगाव , वाजेवाडी ,हिवरे
अनूसुचित जमाती महिला प्रवर्ग -वडगाव रासाई , माळवाडी
अनुसुचित जमाती -कुरुळी
नागरिकांचा मागासवर्ग महिला ( ओबीसी महिला ) – कर्डे ,चव्हाणवाडी , म्हसे बुदुक , पिंपरी दुमाला , वाडा पुनर्वसन , सादलगाव , पिंपळसुटी , नांगरगाव , निमगाव भोगी , आलेगाव पागा , बाभूळसर बुदृक ,पिंपळे जगताप ,रावडेवाडी ,
नागरिकांचा मागासवर्ग ( ओबीसी )- कासारी , शरदवाडी , अण्णापूर , कारेगाव , मिडगुलवाडी ,कोळगाव डोळस , वाघाळे , पारोडी , खंडाळे ,फाकटे , कवठे येमाई , आंधळगाव , कान्हूर मेसाई
सर्वसाधारण महिला -आंबळे, कळवंतवाडी , धानोरे ,शिंदोडी ,निमगाव दुडे , केंदुर, विठ्ठलवाडी
पिंपरखेड , गणेगाव दुमाला बुरुंज वाडी , कोंढापूरी , टाकळी भीमा , चिंचोली मोराची , गुनाट , उरळगाव , शिक्रापूर , निर्वी , कोरेगाव भीमा , दरेकरवाडी , आपटी , न्हावरा ,पाबळ ,धामारी , जातेगाव बुदृक ,डिंग्रजवाडी ,खैरेनगर , मोटेवाडी ,वरुडे , निमोणे , तर्डोबाचीवाडी ,
सर्वसाधारण करीता खुला प्रवर्ग –
ढोकसांगवी , भांबर्डे , संविदणे , बाभुळसर खुर्द , चिंचणी , शिरुर ग्रामीण , काठापूर खुर्द , वडनेर खुर्द , शिरसगाव काटा , टाकळी हाजी , चांडोह , करंदी , रांजणगाव सांडस , तांदळी , मांडवगण फराटा , तळेगाव ढमढेरे , सोने सांगवी , दहिवडी , सणसवाडी , मलठण , रांजणगाव गणपती , सरदवाडी , इनामगाव , खैरेवाडी , जातेगाव खुर्द , गणेगाव खालसा , करंजावणे ,पिंपळे खालसा