पेट्रोलपंपावरील कामगारांकडून ९४ हजारांची चोरी; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर, ता. २२ जुलै (डेली न्यूज पोस्ट-२४)
निमोणे, ता शिरुर येथील परफेक्ट एच. पी. पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या चार कामगारांनी मिळून ९४ हजार ५२० रुपयांची रोकड चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सौ. राजेश्री अनिल काळे (वय ४३, रा. निमोणे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .दिनांक २१ जुलै रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपावर काम करणारे चार कामगारांनी पंपाची दिवसभरातील कलेक्शन रक्कम आणि उचल केलेली रोख रक्कम मिळून एकूण ₹९४,५२०/- रुपये चोरी करून पलायन केले.
या प्रकरणी1. रामेश्वर हरिशचंद्र गर्गोंड (रा. खबरा, थाना देवरी, जि. रामसेन, म.प्र.)2. रमन सिताराम ठाकूर (रा. मदनपूर बरेली, नरसिंहपूर, म.प्र.)
3. आकाश विक्रम ठाकूर (रा. सहजपूर ऊटकटा, जि. सागर, म.प्र.)4. सोनू ठाकूर (पूर्ण नाव अद्याप अज्ञात, रा. हाथीडोल नमाखेडा, थाना देवरी, जि. रामसेन, म.प्र.) या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलीस निरीक्षक श संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार टेंगले करत आहेत.

