विशेष

शिरूरकरांचे श्रद्धास्थान मामीजीची देवी (रेणुकामाता )

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट -२४)
शिरुरकर वासियांची मामीजीची देवी ही श्रध्दास्थान असून असंख्य भाविक दररोज या मंदिरातील रेणुकामाते चे दर्शनासाठी गर्दी करित असतात.

oplus_13107

शहराबाहेरील डोंगरावर हे मंदिर आहे.या मंदिराला मामीजीजीचे मंदिर म्हणुन ओळखले जाते.मामीजी उर्फ शांताबाई कुंदनमल पितळे यानी या मंदिराची उभारणी केली. रेणुकामातेच्या त्या निस्सीम भक्त होत्या. हे मंदिर त्यांच्याच पुढाकाराने सन 1991मध्ये बांधण्यात आले.मंदिर येथे होण्यापुर्वी मामीजीच्या सरदार पेठ येथिल घरी नवरात्र उत्सव होत असे. मामीजीच्या मनात रेणुका मातेचे भव्य असे मंदिर व्हावे अशी इच्छा होती.त्यामुळे त्यानी गावा लगत असणा-या स्वमालकीच्या जागेतील डोंगरावर मंदिर बांधण्याचे ठरविले.त्याच्या या कामास अनेक मदतीचे हात पुढे आले व मंदिर उभे राहिले.त्यानंतर मंदिरा समोर भव्य असा सभामंड्प बांधण्यात आला आहे.येथे दर्शनासाठी भाविकांची दररोज गर्दी होते.नवरात्रीत देवीच्या मुख्य उत्सव असतो.मामीजीचे काही वर्षा पुर्वी निधन झाले त्याची समाधी मंदिराच्या पायथ्याशी बांधण्यात आली आहे.
त्याच बरोबर एमआयडीसीतील कामगारांनी मंदिरा लगर डोंगरावर झाडे लावून परिसर हिरवेगार केला असून भाविकांना बसण्यासाठी बाकडे ही बसवले आहेत मंदिर परिसरात तुलसिदास पणीकर यांनी माहूरगडाच्या रेणूकामातेचे मंदिर बांधले असून या मंदिरा बरोबर श्रीदत्त, व शंकर महादेवाचे ही मंदिर येथे आहे .
भक्तांची मनोकामना पुर्ण करणारी देवी म्हणुन या मंदिराची ओळख आहे. नवरात्रात डोंगरावरिल या रेणुकामातेचे दर्शन घेण्यासाठी पहाटे भाविक परिसरातुन मोठ्या संख्येने पायी येत असतात.नवरात्रात निमित्त्त मंदिर परिसरातील डोंगरावर लहान मुलांसाठी पाळणे,लहान मुलांची खेळणीची दुकाने मोठ्या प्रमाणावर लावण्यात आली आहेत . नवरात्रात दररोज मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. प्रसिद्ध सनईवाले राऊत यांचे सनईवादन दररोज नवरात्रात येथे होते .मागील ४० वर्षाहुन आधिक वर्ष त्यांचे सनई चौघडा वादन नवरात्रात होत असते. डोंगरावर असणाऱ्या या रेणुकामातेचा भक्त्तामध्ये वाढ होत असून मंदिर परिसरात झाडे लावण्यात आली असून भाविकांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई केल्याने परिसर उजळून निघाला आहे.
त्याच बरोबर देवीची गाणी , भजने व दांडियाचे आयोजन मंदिरात केले जाते .
कोजागिरी पौर्णिमेस महाप्रसादाचे आयोजन केले जाते .दसराच्या दिवशी रेणुकामाता ग्रामप्रदक्षिणे करीता शहरात मिरवणुकी द्ववारे जाते .
दर मंगळवार व शुक्रवारी ही मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असतात.
रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या
अध्यक्षा सरला भळगट आहेत तर उपाध्यक्ष – सुवालाल पोखरणा व सचिव – मनसुख गुगळे आहेत .
विश्वस्त म्हणून
नामदेवराव घावटे , वाल्मिकराव कुरुंदळे . रामभाउ शेटे , सपंतराव कर्डिले, गायत्री पटवा ,बाळासाहेब कर्नावट , संजय शिंदे , श्रीकांत भळगट , संपत दसगुडे , विजय घावटे , अभिलाष घावटे , मंगल दसगुडे , ॲड . अमित खेडकर , आदी काम पाहतात .
फोटो ओळी
पुणे नगर रोडवरिल डोंगरावर असलेले रेणुकामाता ( मामीजीचे ) मंदिर
ऱेणुकामातेची मुर्ती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button