शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम }
महाराष्ट्रातील पूरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त बांधवासाठी शिरूर शहरातून मदत पाठविण्यात येणार असून या संदर्भात दिनांक ३ ऑक्टोबर व ४ ऑक्टोबर रोजी मदतफेरी काढण्यात येणार असून या मदतफेरीच्या माध्यमातून गोळा झालेल्या निधीतून पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक असणारा वस्तू जसे अंथरून पांघरून, बाज, खाट्या, साडी औषधं व शैक्षणिक साहित्य पाठविण्यात येणार आहे.
याबाबत चर्चा विनिमय करण्या करीता शिवसेवा मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर, कृषीलोक विकास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक, लोकजागृती संघटनेचे ओमप्रकाश सतिजा, मावळाई प्रकाशनचे डॉ. सुभाष गवारी, बांधकाम व्यावसायिक विलास गोसावी, सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाचंगे, प्रीतेश फुलडाळे, शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सदस्य जयवंत साळुंखे, कुंभार समाज शिरूरचे अध्यक्ष योगेश जामदार, डॉ.अतुलकुमार बेंद्रे, काँग्रेस आय चे अजिम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते संजय बांडे, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, वात्सल्य फाउंडेशनच्या उषा वाखारे, परवीन शेख मनसेचे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, माजी नगरसेविका माया गायकवाड, मनसेच्या डॉ. वैशाली वाखारे, हर्षद शिर्के प्रा. सतीश धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते.
मदती संदर्भात वरील कार्यकर्ते गावातील गणेश मंडळे सामाजिक संस्था यांच्या भेटी घेऊन मदतीसाठी त्यांना आवाहन करणार आहे.
या कार्यात अधिकाधिक लोकांच्या सहभाग अपेक्षित असून मदत गोळा करण्या बाबत कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा.
मंगळवारी दिनांक ३० संप्टेंबर व बुधवारी दिनांक १ ऑक्टोबर रोजी मदतीच्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.