शिरूर पोलिसांची जनजागृती : सोशल मीडियावर जबाबदारीने वर्तन करण्याचे आवाहन
शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}
शिरूर पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण तर्फे नागरिकांना सोशल मीडियावर जबाबदारीने वर्तन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मिडीयावर उदा. व्हाट्सॲप फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, इ. वरून आक्षेपार्ह टिपण्णी करु नये.
राजकिय व धार्मिक पोस्ट करण्याचे टाळावे. ज्यामुळे समाजामध्ये दोन गटांमध्ये वाद निर्माण होणार नाही व जातीय सलोखा आबाधित राहण्यास मदत होईल याची काळजी घेऊन पोस्ट करावी. सोशल मिडीयाद्वारे वैयक्तिक व वादग्रस्त पोस्ट करु नये, अथवा पुढे फॉरवर्ड करू नये. आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
कोणतीही पोस्ट करताना त्याची सत्यता किती आहे ते पडताळूनच पोस्ट करावी. व्हाट्सअॅप व फेसबुक, इंस्टाग्रामवर राजकिय नेते व तसेच राजकिय पक्षांबाबत विनाकारण वादग्रस्त पोस्ट करुन
आपल्या गावामधील सामाजिक सलोख्यास बाधा निर्माण होईल असे कोणते ही गैरकृत्य करु नये. सोशल मिडीयाचा गैरवापर करुन व इतर प्रतिष्ठीत व्यक्तिंचे नावाने फेक अकाऊंट ओपन करुन विनाकारण त्यावरुन अश्लील मॅसेजेस व पोस्ट करु नये.

वरील प्रमाणे कोणीही सोशल मिडीयाचा गैरवापर करून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशी पोस्ट व मॅसेज करुन सोशल मिडीयावर व्हायरल करेन त्यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रचलित कायद्यानुसार योग्य तो कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा ही पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिला आहे.