Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}शहरातील करंजुले वस्ती येथे मृतावस्थेत आढळलेल्या गायीवर अंत्यसंस्कार करून मानवतेचा आदर्श ठेवण्यात आला. या साठी नगरसेवक सागर नरवडे यांनी पुढाकार घेत प्रशासनाच्या मदतीने ही कार्यवाही पार पाडली.

मृत गायीबाबत पुढील कार्यवाहीबाबत चर्चा सुरू असताना, नरवडे यांनी गायीवर हिंदू धर्मशास्त्रानुसार अंत्यसंस्कार करण्याचा प्रस्ताव मांडला. प्रशासनाच्या सहकार्याने गायीला पांजरपोळ येथे नेऊन विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.



