धार्मिंकविशेष

महाराष्ट्र भूषण, खान्देश केसरी गौतममुनीजी महाराज ( बरसादाता ) यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिरूर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
महाराष्ट्र भूषण, खान्देश केसरी
गौतममुनीजी महाराज ( बरसादाता ) यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिरूर मध्ये विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
श्री.सकल जैन श्रावक संघ घोडनदी यांच्या सह श्री. वर्धमान स्थानवासी श्रावक संघ व विविध धार्मिक सामाजिक संस्था यांच्या वतीने गौतममुनीजी महाराज यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्री कंचन बाई शांतीलाल दुगड धर्मसभा मंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जगप्रसिद्ध उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारिवाल, चेतनमुनीजी महाराज, संघपती भरत चोरडिया, वसंत गादिया, राजेंद्र कोठारी, अनिल बोरा, आनंद फुलफगर, राहुल बोथरा, नीलेश संघवी, माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर, माजी नगरसेवक विजय दुगड,कपिल बोरा,प्रशांत गादिया, सतीश धाडीवाल, रमाकांत बोरा, माजी नगरसेवक डॉ. धनराज सुराणा, सागर साखला, रमणलाल बोरा, श्रेणिक नहार, चंदूलाल चोरडिया, कामिनी बाफना,विजय बाठीया, प्रकाश बोरा, पियूष संतोष भंडारी, आदी उपस्थित होते.
यावेळी मंगल कलशचा लिलाव मूळचंद सुराणा यांनी घेतला.उद्योगपती प्रकाश धारीवाल व ॲड सागर कोठारी व कोठारी परिवार व बबनभाऊ यादव यांच्या ही सन्मान यावेळी करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत मानपत्र गौतममुनीजी महाराज यांना देण्यात आले.
प्रकाश धारीवाल म्हणाले की गौतममुनीजी महाराज यांची दिक्षा शिरूर मध्ये झाली. त्यांच्या ५० व्या वाढदिवस शिरूर येथे होत आहे.२७ वर्ष त्यांच्या दिक्षेला झाली आहे. जैन धर्माची सेवा ते करत आहे.
विजय दुगड यांनी घोडनदी येथे यापूर्वी झालेल्या दिक्षा संदर्भात माहिती देऊन शिरूर हे जैन धार्मियाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असल्याचे सांगितले.
चेतनमुनीजी महाराज म्हणाले की घोडनदी मध्ये त्यांची दिक्षा संपन्न झाली.
अनेकांना धर्माच्या मार्गावर आणण्याचे काम गौतममुनीजी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन वसंत गादिया यांनी केले तर आभार संघपती भरत चोरडिया यांनी मानले.
कार्यक्रमासाठी भाईदर, नाशिक, वैजापूर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पनवेल कामोठे, वाघोली, पिंपरी चिंचवड, वडगाव शेरी यासह पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध ठिकाणचे जैन संघ उपस्थित राहिले होते.
यावेळी प्रसिद्ध उद्योजक प्रकाश धारिवाल दिना भाभी धारीवाल व उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या वतीने गौतमी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button