राजकीयराष्ट्रीयविशेष

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर भाजपात

तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार

शिरूर {डेली न्यूज पोस्ट- 24}
शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे { शरदचंद्र पवार } नेते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर राजाराम पाचुंदकर यांनी मुंबई मध्ये आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी आमदार राहुल कुल, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रदीप कंद आदी उपस्थित होते.
पाचुंदकर यांच्या पक्षप्रवेशामुळे शिरूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो. पाचुंदकर यांच्या पक्षप्रवेशाने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
पाचुंदकर अभ्यासू आणि अनुभवी नेते आहेत त्यांनी सन २००२ साली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले, तसेच राष्ट्रवादी पक्षात तालुकाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी नंतर त्यांनी जेष्ठ नेते ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या समवेत राहण्याचा निर्णय घेतला.
विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
आगामी काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती व शिरूर नगर परिषदेची निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर
पाचुंदकर यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश भाजपाची ताकद वाढवणारा ठरेल असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. युवकांचे संघटन व कोणताही विषय मांडताना अभ्यासू पद्धतीने मांडणी या पाचुंदकर यांच्या जमेच्या बाजू आहे.
तालुक्यातील वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळावा म्हणून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाचुंदकर
यांनी सांगितले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button