
शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शिरूर नगरपरिषदेच्या पीएमश्री शाळा क्रमांक -५ मध्ये शासनाच्या वतीने ३० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या संगणक लॅब आयडियल सेंटर चे उदघाट्न प्रसिद्ध उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील, प्रशासन अधिकारी किसनराव खोडदे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार, शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, अविनाश मल्लाव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष् मुजफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक विनोद भालेराव, आरपीआयचे अध्यक्ष नीलेश जाधव,
माजी नगरसेवक नीलेश लंटाबळे, नोटरी रविंद्र खांडरे, नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ, दत्तात्रेय बर्गे,मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मुख्याध्यापक संजय वाघ, मुख्याध्यापिका प्रतिभा आहेर,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जामदार, बाळासाहेब परदेशी,योगेश जामदार, हाफिज बागवान, राहुल ओस्तवाल, समाधान मुंगसे, विकास जाधव, दीपक कोल्हे, मनोज अहिरे, आदित्य बनकर आदी उपस्थित होते.




