‘आप’ची पुणे जिल्ह्यात निवडणुकीसाठी ‘मायक्रो स्ट्रॅटेजी’; शिरूर येथे कोअर कमिटी बैठक संपन्न शिक्षण-आरोग्याला प्राधान्य; स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याचा निर्धार
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24} आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (आप) पुणे जिल्हा कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक शिरूर येथील शिवम हॉटेलमध्ये झाली. बैठकीत पक्षाच्या निवडणूक धोरणावर, संघटनात्मक रचनेवर आणि सूक्ष्म रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस पुणे जिल्हा, शिरूर तालुका आणि शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही यावेळी करण्यात आली.
बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष वैभव टेमकर यांनी पक्षाची आगामी दिशा स्पष्ट केली.
मातोश्री कलावती नवले यांना डेली न्यूज पोस्ट च्या वतीने भावपूर्ण आदरांजली
ते म्हणाले, “आगामी निवडणुकांसाठी आम्ही मायक्रो स्ट्रॅटेजी निश्चित केली असून, दिल्ली-पंजाब मॉडेल आणि स्वच्छ राजकारणाचे धोरण पुणे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत.”
“आप पक्ष शिक्षण, आरोग्य व दळणवळण या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करणार आहे. उच्च दर्जाच्या शाळा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे,” असे टेमकर यांनी सांगितले.
“सामान्य नागरिक दररोज विविध प्रकारे कर भरतो. त्यामुळे त्याला दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे हे सरकारचे उत्तरदायित्व आहे. महाराष्ट्रात सध्या अशा सुविधा दिसत नाहीत. आप सत्तेत आल्यास सरकारी दवाखान्यांची परिस्थिती सुधारण्यावर भर दिला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिरूर शहराध्यक्ष डांगे यांनी सांगितले की, “आप पक्ष शिरूर नगर परिषदेच्या सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. उमेदवार निवडताना स्वच्छ प्रतिमा, भ्रष्टाचारमुक्त कामकाज आणि जनतेच्या सेवेला बांधिलकी हेच निकष असतील.”
या बैठकीतून पुणे जिल्ह्यात आम आदमी पार्टीने निवडणूक तयारीला सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावेळी आपचे शिरूर तालुका अध्यक्ष अशोक धुमाळ उपाध्यक्ष मनोज ढवळे महासचिव माऊली बोबडे,सचिन जाधव सलीम नदाफ,कैलास बोबडे, नितीन गरड,शहबान शेख,अजीम शेख,दिलीप पोखरकर,नितीन गरड,प्रमोद वाघ