राष्ट्रीयविशेष

शिरूर च्या राजकारणात भूकंप

कार्यकर्त्यांची निर्णयाचा फेरविचार करावा अशी आग्रही मागणी

 

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम }व्यवसायिक व्यस्तते मुळे यंदाचा निवडणुकीत शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविणार नसल्या ची घोषणा आघाडीचे सर्वेसर्वा उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धरिवाल यांनी केली.  लोकशाही क्रांती आघाडी ने यंदाची निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिरूर शहर विकास आघाडीचे प्रकाश धरिवाल यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने शिरूरच्या राजकारणात भूकंप झाला आहे. शिरूर नगरपालिकेची निवडणुक जाहीर झाली असून गेल्या अनेक वर्षा पासून शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता पालिकेवर असल्याने यंदाच्या निवडणुकीत आघाडीची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष होते.आज धारिवाल यांच्या आशीर्वाद या निवास स्थानी कार्यकर्त्यासमोर भूमिका मांडताना धारिवाल बोलत होते.यावेळी धारिवाल म्हणाले की माझ्या व्यवसाय सात हुन अधिक राज्यात विस्तारेल्या असून वडील रसिकलाल धारिवाल यांच्या निधनानंतर व्यवसायाचा सर्व व्याप मला एकट्याला सांभाळावा लागतो. व्यवसायाची मोठी जबाबदारी माझ्या वर आहे. मी कोणत्या पक्षात नसून सर्व पक्षीय लोकांशी माझे चांगले संबंध आहे. कोण्या विषयी द्वेषा ची भावना नाही.राजकारण नाही तर समाज कारण करत आलो आहे.अर्धवट माहितीवर विरोध नको.एखाद्या विषया संदर्भात शंका असेल तर आधी शंका निरसन करण्यासाठी या. जर निरसन झाले नाही तर मग विरोध करा. वडील रसिकलाल धारिवाल यांच्या निधना नंतर मी एकटा आहे. कामाची समाजकारणाची आवड आहे. मतभेद असावेत मनभेद नसावेत.चिरंजीव आदित्य यास आता लगेच राजकारणात घालणार नाही. याबाबतचा निर्णय आदित्य स्वतः घेतील यापुढे ही समाजकारण व शिरूर शहराचा विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे धारिवाल म्हणाले.पालिकेत काम करताना सर्वानी चांगली साथ दिली. वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक व अपक्ष या सर्वांनी साथ दिली. काम करताना भेदभाव न करता सर्वांची कामे केली. विरोधक म्हणून निवडून आलेल्याची कामे केल्याचे धारिवाल म्हणाले.दरम्यान धारिवाल यांनी त्याच्या या निर्णयाचा फेरविचार करावा अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर शहरविकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार सचिव मनसूख गुगळे ,पांडुरंग थोरात माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नसीम खान, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, चंद्रकांत बोरा, जाकीरखान पठाण,शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख, काँग्रेस आयचे अध्यक्ष किरण आंबेकर, माजी नगरसेवक विठ्ठल पवार, सचिन धाडीवाल, अशोक पवार, विनोद भालेराव,  संतोष भंडारी,यांच्या सह माजी सरपंच अरुण घावटे, बाबाजी वर्पे, संजय शिंदे, सोमनाथ घावटे, नामदेवराव घावटे, डॉ. संतोष पोटे, किरण बनकर, प्रदीप बारवकर, किरण पठारे संतोष थेऊरकर,विनोद धाडीवाल, आदेश बोरा, रुपेश संघवी,प्रमोद गायकवाड,अविनाश मल्लाव, अविनाश जाधव, निलेश लंटाबळे, दादाभाऊ थेऊरकर, अविनाश जाधव, संतोष गव्हाणे, अजीमभाई सय्यद, शतनु खांडरे, राजेंद्र लोळगे, संतोष शितोळे, किरण बनकर, उमेश भोसले, सतीश खोले, सुशांत कुटे, निलेश जाधव, सिकंदर मण्यार, अविनाश जाधव, अविनाश घोगरे, रणजित गायकवाड, सुभाष गांधी, आप्पासाहेब पोटघन, अभिजित आंबेकर, शैलेश जाधव, प्रशांत शिंदे, जयवंत साळुंखे, बलदेवसिंग परदेशी आदी उपस्थित होते.

शिरूर शहर व धारिवाल परिवाराचे भावनिक व कौटुंबिक नाते आहे.गेले अनेक वर्षा पासून शिरूर शहाराचा पालिकेच्या राजकारणात धारिवाल यांच्या शब्द अंतिम मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत अनेक जण धारिवाल यांच्या आघाडी कडून लढण्यास इच्छुक होते. धारिवाल यांच्या या निर्णयाने इच्छुकंसह शिरूरकरांना मोठया धक्का बसला आहे. या निर्णयाच्या फेरविचार करावा अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

 

शिरूर शहराच्या राजकारणात  व पालिका निवडणुकीत शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश रसिकलाल धारिवाल, लोकशाही क्रांती आघाडीचे रवींद्र धनक व भाजपाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या भूमिका निर्णायक राहिल्या आहेत. दोन दिवसापूर्वी धनक यांनी लोकशाही क्रांती आघाडी पालिका निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ धारिवाल यांनीही पालिका निवडणुक लढणार नसल्याच जाहीर केल आहे. तर माजी आमदार लोकनेते बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाले आहे. ही शिरूर शहरातील राजकारण्यातील अभूतपूर्व परिस्थिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button