शिरूर : {डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिल्या दिवशी एक ही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित जगताप व मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली. 

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख सोमवार दिनांक १७ नोव्हे २०२५ अशी आहे.मागील चार वर्षापासून रखडलेल्या नगरपरिषद निवडणूका लागल्या असून शिरूर नगरपरिषदेच्या सर्वात मोठा वार्ड हा वार्ड क्रमांक ३ असून त्याची मतदार संख्या ३८८१ इतकी आहे. त्यात २९१७ पुरुष मतदार आहेत तर १९६४ स्त्री मतदार आहेत.

सर्वात कमी मतदारसंख्या असणारा वार्ड क्रमांक १२ असून या वार्डाची मतदार संख्या १८०५ आहे. यात स्त्री मतदार ९२२ तर पुरुष मतदार ८२३ आहेत.
शिरूर नगर परिषदेची नगरसेवक संख्या 21 वरून 24 अशी झाली आहे. तीन नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे. शिरूर नगर परिषदेच्या हद्द वाढीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. कदाचित यंदाच्या निवडणुकीनंतर पुढील निवडणुका या शिरूर नगर परिषदेच्या वाढलेला हद्दीनुसार होतील असे बोलले जाते. त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

सन 2011 नुसार शिरूर शहराची एकूण लोकसंख्या ३७३११ इतकी असून त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ४६१३ तर अनुसूचित जमाती १००८ इतकी आहे. प्रत्येकी 12 प्रभागातून दोन नगरसेवक असे 24 नगरसेवक निवडून जाणार असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे .

प्रभाग निहाय आरक्षण व स्त्री पुरुष मतदार व एकूण मतदार संख्या पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक -१ { कामाठीपुरा, कैकाडी आळी, साळुंखे आळी, रम्यनगरी, प्रोफेसर कॉलनी, ढोर आळी, कुंभार आळी, मुंबई बाजार } –
सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
स्त्री मतदार – १३२० पुरुष मतदार – १२६५ एकूण मतदार – २५८५
प्रभाग क्र -२ { कुंभार आळी, कुरेशी मोहल्ला, मदारी वस्ती, इस्लामपूरा, हल्दी मोहल्ला, बुरुड आळी, मुंबई बाजार} – ओबीसी महिला, सर्वसाधारण
स्त्री मतदार – १७३६ पुरुष मतदार – १६११ एकूण मतदार – ३३४७
प्रभाग क्र -३ { सोनार आळी, मारूती आळी, अष्टविनायक सोसायटी, खांडरे आळी, भाजी बाजार, फकीर मोहल्ला,
लाटे आळी, भाजी बाजार, सुभाष चौक, हलवाई चौक } – ओबीसी, सर्वसाधारण महिला
स्त्री मतदार – १९६४ पुरुष मतदार – १९१७ एकूण मतदार – ३८८१
प्रभाग क्र -४ { सरदार पेठ, मारुती आळी, चर्च, आंबेडकर नगर, सुशीला पार्क, खारा मळा, पाचारणे मळा, सूरज नगर }- अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण
स्त्री मतदार -१७७९ पुरुष मतदार – १७२३ एकूण मतदार – ३५०३

प्रभाग क्र -५ { महादेव नगर, जोशीवाडी, विठ्ठल नगर, पोलीस लाईन, स्टेट बँक कॉलनी } – सर्वसाधारण महिला,सर्व साधारण
स्त्री मतदार – १६०५ पुरुष मतदार – १६६९ एकूण मतदार – ३२७४

प्रभाग क्र -६ { गणेश नगर, गुजर कॉलनी, बागवान नगर, स्टेट बँक कॉलनी } – ओबीसी महिला, सर्वसाधारण
स्त्री मतदार – १०९६ पुरुष मतदार – १०५९ एकूण मतदार – २१५५
प्रभाग क्र -७{ यशवंत कॉलनी, रयत शाळा सैनिक सोसायटी, जिजामाता सोसायटी, शिवाजी सोसायटी, रेव्हन्यू कॉलनी, करंजुळे वस्ती }- ओबीसी, सर्वसाधारण महिला
स्त्री मतदार – ११३७ पुरुष मतदार – ११६३ एकूण मतदार – २३००
प्रभाग -८ { डंबेनाला, आडत बाजार, कापड बाजार, राम आळी, मारूती आळी, सरदार पेठ, रेव्हन्यू कॉलनी, शांती नगर }- ओबीसी महिला, सर्वसाधारण
स्त्री मतदार – १६६६ पुरुष मतदार – १५७० एकूण मतदार – ३२३६
प्रभाग क्र -९ { साई नगर, काची आळी, सय्यदबाबा नगर, संजय नगर, सिद्धार्थ नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती }- अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला
स्त्री मतदार – १२०८ पुरुष मतदार – ११३७ एकूण मतदार – २३४५
प्रभाग क्र १० { नवीन मार्केट यार्ड, वाडा वसाहत, गोपाळ वस्ती, छत्रपती कॉलनी, इंदिरा नगर, बीसी सोसायटी, इसवे नगर, पाबळ फाटा }- अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण
स्त्री मतदार – १०८३ पुरुष मतदार – १७७६ एकूण मतदार – २१५९
प्रभाग क्र -११ { कामाठी पुरा, एस. टी कॉलनी, प्रीतमप्रकाश नगर, पवार मळा, मंगलमूर्ती नगर} – अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण
स्त्री मतदार – ११७६ पुरुष मतदार – १२२७ एकूण मतदार – २४०३

प्रभाग क्र -१२ { हुडको कॉलनी, बोरा कॉलेज, बाफना मळा, दिघे मळा }-
ओबीसी व सर्वसाधारण महिला
स्त्री मतदार – ९२२ पुरुष मतदार – ८३३ एकूण मतदार – १८०५

