Uncategorizedक्राईम

विवाहितेच्या छळप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) विवाहितेच्या छळप्रकरणी सासू, सासरा, पती, जाऊ, दीर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहिनी  उर्फ रेश्मा अनिल सालके, (वय ३४, रा. बाबूरावनगर शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
शिरूर मधील  बाबूरावनगरमध्ये राहणारे बाळासाहेब शेवाळे यांची कन्या मोहिनी उर्फ रेश्मा यांचे जवळा , ता . पारनेर , जिल्हा – अहिल्यानगर येथील अनिल सालके याचा बरोबर लग्न झाले  . लग्नानंतर सुरुवातीला  व्यवस्थित वागणूक दिली. त्यानंतर  मोहिनी उर्फ रेश्माने माहेरहून पैसे आणावेत, यासाठी शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला. मोहिनीस  उपाशी ठेवणे, शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली.
मोहिनी उर्फ रेश्मा यांना  लग्नात दिलेले अकरा तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच तिच्या वडिलांकडून दोन लाख रुपये तिच्या सासऱ्यांनी घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .या प्रकरणी पोलीसांनी पती अनिल सुरेश सालके, सासू शैलाबाई सुरेश सालके, सासरे सुरेश दगडू सालके, जाऊ रेश्मा गणेश सालके, दीर गणेश सुरेश सालके सर्व  रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर या पाच जणांच्या  विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार उमेश भगत करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button