Uncategorizedमहाराष्ट्रविशेष
योगमय झाले शिरूर; शेकडो नागरिकांचा सहभाग, शहरभर निरोगी जीवनाचा संदेश
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 23आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिरूर शहर आणि परिसर रविवारी अक्षरशः योगमय झाला. विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने आयोजित योग व प्राणायाम शिबिरांमध्ये विद्यार्थी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘योग करा, निरोगी रहा’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयात तीन दिवसीय योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगगुरू शिवाजी कुलाळ यांनी योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, नगरसेवक सागर नरवडे, संतोष थेऊरकर, उमेश शेळके, अमित कर्डिले, नगरसेविका पूजा पोटावळे, सुनिता भुजबळ तसेच माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









