Uncategorizedराष्ट्रीयविशेष
तणावाचे योग्य व्यवस्थापन केले तर जीवन अधिक सक्षम, सर्जनशील आणि यशस्वी होऊ शकते : मानसोपचारतज्ञ डॉ. चारुदत्त कुलकर्णी .


यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा क्लबचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी बाळकृष्ण साबळे, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, संदेश केंजळे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मनोहर वीर, डॉ. दर्शना जेधे, आदी उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाले की तणावाचा योग्य दृष्टीकोन जीवनाला घडवतो. “घटना तणाव देते असे नाही, तर त्या घटनेला आपण कोणत्या दृष्टीने पाहतो यावर आपला तणाव ठरतो,” असे प्रतिपादन कुलकर्णी यांनी केले. विविध मानसिक ताणतणाव, त्यांचे स्वरूप आणि त्यावर उपाय याबाबत ते बोलत होते.डॉ. कुलकर्णी म्हणाले की,
कोणत्याही परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. “घटनेत ताण निर्माण करण्याची शक्ती नसते, आपल्या डोक्यातील विचार आणि दृष्टीकोन ताण वाढवतात. तणाव हा नकारात्मकच असतो असा गैरसमज दूर करताना त्यांनी सांगितले की, योग्य दृष्टीकोनातून पाहिल्यास तणाव प्रेरणादायी ठरू शकतो. “टेन्शनमुळे कृतीकडे प्रवृत्ती तयार होते. रोमांच, जागरूकता आणि निर्णयक्षमता वाढते. तणाव आणि कार्यक्षमता यांच्यात संबंध आहे,”
असे त्यांनी नमूद केले.फुल टेन्शन आणि कुल टेन्शन यातील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले, “फुल टेन्शनमध्ये उद्दिष्ट आणि प्राधान्यक्रम दिसेनासे होतात. समस्येचे समाधान शोधण्याऐवजी इतरांना दोष देण्याची प्रवृत्ती वाढते. पण कुल टेन्शनमध्ये व्यक्ती पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत राहते. पर्याय सुचणे थांबले की टेन्शन वाढते. म्हणूनच पर्याय निर्माण करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.”

