शिरूर नगरपरिषद निवडणुक ५ जणांचे अर्ज छाननीत बाद
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}: शिरूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदा करिता ६ जणांनी ९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज छाननीत नगराध्यक्ष पदाचे सर्वांचे अर्ज वैध ठरले . तर नगरसेवक पदाच्या करीता ५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. १८८ जणांचे अर्ज वैध ठरले.
एकूण २४ नगरसेवक पदाच्या जागेकरिता १६५ जणांनी १९३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर नगराध्यक्ष पदा करिता ६ जणांनी ९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे ११ नंबर प्रभागातील उमेदवार तुषार वेताळ याचा जोडपत्रावर सुचकाची सही नसल्याने बाद झाला.परंतु याच वार्ड मधून अपक्ष म्हणून सादर केलेला उमेदवारी अर्ज वेताळ यांचा वैध ठरला आहे.
तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षांच्या प्रभाग क्रमांक १२ मधून व प्रभाग क्रमांक २ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले अनुक्रमे पूजा अमित शिर्के व प्रभाग क्रमांक १२ मधील महेंद पाचर्णे यांचे उमेदवारी अर्ज डमी असल्याने बाद झाले.
प्रभाग क्रमांक ५ मधून अर्ज दाखल केलेल्या भाजपच्या लत्ता अर्जुन ससाणे यांच्या उमेदवारी अर्जा सोबत ए. बी फॉर्म नसल्याने बाद झाला.
वार्ड क्रमांक ११ मधील शिवसेना {शिंदे,} च्या सुप्रिया साकोरे यांच्या उमेदवारी अर्जा सोबत ए. बी फॉर्म जोडपत्र नसल्याने बाद झाला.परंतु वार्ड क्रमांक ७ मधून शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या सुप्रिया साकोरे यांचा अर्ज वैध ठरला.
वार्ड क्रमांक ११ मधील राष्ट्रवादी काँग्रेस { शरदचंद्र पवार }पक्षाच्या उमेदवार वैष्णवी धुळे यांच्या संदर्भात अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक कविता वाटमारे यांनी हरकत घेतली होती. परंतु या संदर्भातील हरकत निकाली काढण्यात येऊन धूळे यांची उमेदवारी वैध ठरविण्यात आली.