राष्ट्रीय
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम } शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या माजी नगरसेविका मनीषा कालेवार यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या पदासाठी आता पंचरंगी लढत निश्चित झाली आहे.
चार राजकीय पक्षांचे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष वैशाली वाखारे या अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहेत.नगरसेवक पदासाठी एकूण ९९ उमेदवार रिंगणात कायम राहिले असून माघारीमुळे अनेक प्रभागांमध्ये समीकरणे बदलली आहेत.






