विशेष

श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी निमित्त शिरूर येथे धार्मिक कार्यक्रम

शिरूर दिनांक,( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळा शिरूर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिरूर शहर नाभिक समाजाचा वतीने शिरूर रामलिंग रस्त्यावर शिक्षक कॉलनी येथे नाभिक समाज यांच्या वतीने संत सेना महाराज यांचे मंदिर काही वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. पुण्यतिथी निमित्त मंदिरावर विद्युत रोषनाई करण्यात आली होती. पुण्यतिथी निमित्त संत सेना महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. ह. भ. प. किरण महाराज भागवत यांचे प्रवचन यावेळी झाले.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
पुण्यतिथी निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल बाबुराव पाचरणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात, माजी नगरसेविका अंजली थोरात,माजी नगरसेवक विनोद भालेराव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार , माजी सरपंच विठ्ठल घावटे, सुनील जाधव, सागर नरवडे, अविनाश जाधव, हलवाई गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे, माजी उपसरपंच गणेश खोले, शिरूर शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष सनी थोरात, माजी अध्यक्ष गोरक्ष गायकवाड,रणजीत गायकवाड, वैभव रायकर, संतोष गायकवाड, नीलेश गायकवाड, तेजस गायकवाड, गणेश शिंदे भूमिपुत्र प्रतिष्ठानचे सुशांत कुटे , योगेश जामदार, प्रमोद महाराज जोशी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल पाचर्णे यांनी सभामंडपाचे कामा करिता निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button