विशेष
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम – 24}भय, भूक व भ्रष्टाचार मुक्त शिरूरचा नारा देत शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक २०२५ ची निवडणुक अपक्ष म्हणून लढवीत असून यंदाचा निवडणुकीत निश्चित परिवर्तन होईल असा विश्वास शिरूर नगरपरिषद वार्ड क्रमांक ८ ब चे अपक्ष उमेदवार व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी व्यक्त केला. ते अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात असून छताचा पंखा ही त्यांची निवडणुक निशाणी { चिन्ह }आहे.
निवडणुकी करिता त्यांनी वचननामा प्रसिद्ध केल्या असून त्यात त्यांनी म्हटले आहे की प्रत्येक प्रभागात तक्रारपेटी बसविणार व नियमित मासिक प्रभागसभा घेणार. शिरुर शहर व उपनगर अंतर्गत परिवहन सेवा (SNPS मिनीबस) सुरु करणार. भाजी बाजार पुनश्च भाजी बाजार येथे भरवण्यासाठी व आठवडे बाजार सुद्धा पुन्हा भाजीबाजार या ठिकाणी भरवण्यासाठी प्रयत्न करून बाजारपेठेला पुन्हा तेच वैभव प्राप्त करून देणार.
शिरूर नगरपरिषदेचे कामकाज नागरिकांसाठी थेट (live) प्रक्षेपण करून पाच कंदील चौक येथे ङएऊद्वारे प्रदर्शित करणार शिरूर नगरपरिषदेचा दवाखाना अद्यावत करून नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार. संपूर्ण शहराला स्वच्छ आणि पुरेशा दाबाने पाणी देणार. शहरातील नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी मुख्य रस्त्यावर व उपनगरात विनाअडथळा प्रवास यासाठी उपाय योजना करणार.शहराची वाढती लोकसंख्या पाहता शिरूर शहरातील गावठाण व उपनगरातील रस्ते नियोजनपूर्वक काम करून धूळ विरहित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार व पार्किंगची व्यवस्था वाढवणार
२०१२ च्या नगर नियोजन आराखड्यानुसार काही दुरुस्त्या करून भव्य क्रीडांगण उभारण्यात येणार. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभी करणार. पालिकेच्या सर्व शाळांचे आधुनिकीकरण तसेच मुला-मुलींसाठी आधुनिक स्वच्छतागृह उभारणार. सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत घरकुल योजना राबवणार तसेच ठेकेदार पद्धतीतील कामगारांना आरोग्य सुविधा उपलब्ध करणार त्याचबरोबर किमान वेतन कायदा कायद्याची अमल बजावणी करने
व भविष्य निर्वाह निधी प्रत्येक महिन्यात कामगाराच्या खात्यात जमा करण्यासाठी तंतोतंत पालन करणार. टपरी धारक यांच्यासाठी केंद्राच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार शहरात होकर्स झोन निर्माण करून गरीब व होतकर तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करणार. शहरातील वयोवृद्ध नागरिकांसाठी आधुनिक नाना नानी पार्क उभारणार.शिरूर हे तालुक्यातील प्रमुख ठिकाण असल्याने या ठिकाणी सुसज्ज असं नाट्यगृह उभारणार.
संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार. महिला व मुलींसाठी प्रत्येक प्रभागामध्ये सॅनिटरी पॅड, व्हेंडींग मशीन बसविणार. संपूर्ण नगरपालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी पुरुष व महिलांसाठी स्वच्छ व सुंदर स्वच्छतागृहांची निर्मिती करणार.घंटागाड्यांना जीपीएस प्रणाली बसविणार. २०१२ च्या शासनाच्या नगरनियोजना नुसार नियोजित प्रस्तावित ठिकाणी मटन व मच्छी मार्केट उभारणार.असे वचननाम्यात सय्यद यांनी नमूद केले आहे.
यंदा परिवर्तन निश्चित असून छताचा पखा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन सय्यद यांनी केले आहे.