Uncategorized
Check Also
Close

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कारंडे यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.न्हावरे येथील श्री.मल्लिकार्जुन विद्यालय व तळेगाव ढमढेरे येथील कॉलेज मध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. मराठी विषयाचे विद्यार्थीप्रिय व अभ्यासू शिक्षक अशी त्यांची ओळख होती. कारंडे यांनी भीमथडी परिसरातील धनगरी लोकसाहित्याचा लोकतत्त्वीय अभ्यास ‘ या विषयावर प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवीसाठी प्रबंध लेखन केले होते. न्हावरा येथे दैनिक लोकमत चे पत्रकार म्हणून ते काम करत.वृत्तपत्रीय लेखनातून विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम .तसेच सामाजिक , राजकीय , सांस्कृतिक विषयांवर लेखन त्यांनी केले न्हावरे ,ता. शिरूर , जि.पुणे येथे श्री मल्लिकार्जुन सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करून वाचन चळवळ वृध्दिंगत होण्यासाठी प्रयत्न केला.
.मराठी पत्रकार परिषदेचे शरद पाबळे व बोरा महाविद्यालयातील माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. बाळकृष्ण लळीत व ज्येष्ठ नेते राजेंद्र पोपटराव गावडे यांनी कारंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.


