विशेष

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24} नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ करिता निश्चित करण्यात आलेले मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्राध्यक्ष वगळता कोणालाही मोबाईल फोन, कॅमेरा किंवा इतर उपकरणे वापरण्याची परवानगी राहणार नाही. सर्व मतदार व प्रतिनिधींनी आपले फोन मतदान केंद्राच्या बाहेर ठेवणे बंधनकारक असल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे.
मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पाटील म्हणाले.