




.या पार्श्वभूमीवर शिरूर येथील शिवसेवा मंदिरात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत सुरक्षित प्रवासासाठी ‘नागरिक समिती’ स्थापन करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. लवकरच समितीकडून शासनदरबारी औपचारिक निवेदन देऊन रस्ते सुरक्षेसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
बैठकीत रविंद्र धनक म्हणाले, की “पुणे–अहिल्यानगर रस्त्यावर वेगमर्यादा दर्शविणारे फलक, सिग्नल, हायमास्ट दिवे, सोलर लाईट्स त्वरित बसवावेत. अशास्त्रीय स्पीड ब्रेकर, वाढती वाहने, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि बायपासवरील बेफाम वेग यावर त्यांनी भाष्य केले.




