Uncategorizedक्राईम
शिरूर दिनांक (वार्ताहर,)जांबूत येथील थोरात वस्तीवर चोरट्यांनी घराची खिडकी उचकटवून घरात प्रवेश करीत हिराबाई लक्ष्मण थोरात वय-५२ यांच्या गळ्यातील मंगलसूत्र व कानातील सोन्याचा कुड्या चोरुन नेल्या. लक्ष्मीबाई यांच्या डावे कानातील कुडी निघत नसल्याने चोरट्याने ती जोरात ओढल्याने त्यांच्या डाव्या कानाच्या पाळीला जखम झाली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हिराबाई लक्ष्मण थोरात वय-५२ यांनी दोन अज्ञात इसमांचा विरोधात फिर्याद दिली आहे .
२९ एप्रिल २०२५ रोजी रात्री दोन ते अडीचचा दरम्यान जांबुत, थोरातवस्ती ता. शिरूर जि. पुणे या ठिकाणी हिराबाई थोरात यांच्या जुन्या घरात दोन २५ ते ३० वर्षे वयाचे अनोळखी इसमानी थोरात झोपलेल्या खोलीची खिडकी उचकटून आतमध्ये प्रवेश केला व त्यातील एकाने लक्ष्मीबाई थोरात यांच्या गळयातील डोरले जबरदस्तीने हिसकावुन घेतले
व दुस-या इसमाने दोन्ही कानातील सोन्याच्या धातुच्या कुडया जबरदस्तीने काढून नेल्या .डावे कानातील कुडी निघत नसल्याने चोरट्याने ती जोरात ओढल्याने लक्ष्मीबाई यांच्या डाव्या कानाच्या पाळीला जखम झाली.