महाराष्ट्रविशेष

शिरूर पालिकेकडून १४० दिव्यांग लाभार्थ्यांना १३ लाखांचा निधी

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी १३ लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले. याअंतर्गत १४० पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ९ हजार २८५ रुपये थेट जमा करण्यात आले.

या निधी वितरण कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषदेच्या रसिकलाल धारीवाल सभागृहात करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, मुख्याधिकारी प्रीतमकुमार पाटील, बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती एजाज बागवान, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा सय्यद, उपसभापती स्वप्नाली जामदार, सभापती स्वाती साठे, नगरसेवक सागर नरवडे, रवींद्र ढोबळे, अभिजित पाचर्णे तसेच नगरसेविका पूजा पोटावळे, सुनिता भुजबळ, संगीता मल्लाव, स्वीटी शिंदे, चारुशीला कोळपकर, रिंकू जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी दिव्यांग बांधवांना शासनाने सुरू केलेल्या विशेष पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. नोंदणीनंतर विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार असून ही नोंदणी नगर परिषदेच्या माध्यमातून मोफत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच शिरूर शहरातील दिव्यांग बांधवांचा स्वतंत्र व्हॉट्सॲप समूह तयार करून शासकीय योजनांची माहिती थेट पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्याधिकारी प्रीतमकुमार पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक तंत्रज्ञ विजय आंधळे यांनी केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक आर्थिक वर्षात नगर परिषदेच्या अर्थसंकल्पातील पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवला जातो. यावर्षी १४५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १४० अर्जदार पात्र ठरले असून प्रत्येकाच्या खात्यात ९ हजार २८५ रुपये जमा करण्यात आले आहेत. या माध्यमातून एकूण १३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.

यावेळी लाभार्थी पिनू सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समूह संघटक महेश गावडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button