Uncategorized
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}सध्याच्या स्पर्धात्मक आणि सोशल मीडियाने व्यापलेल्या युगामध्ये वाढत असलेल्या तरुण पिढीला आपल्या वैभवशाली इतिहासाची, किल्ल्यांच्या परंपरेची ओळख व्हावी तसेच भविष्यातील पिढीने किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने मातोश्री प्रतिष्ठान दरवर्षी किल्ले स्पर्धेचे आयोजन करत असल्याचे मत मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विजेत्यांचे बक्षीस वितरण थेट त्यांच्या घरी जाऊन करण्यात आले. प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

आपले किल्ले ही देशाची शान असून, ते कायम तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान राहावेत यासाठी मातोश्री प्रतिष्ठान दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

