महाराष्ट्र

शिरुर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शहरात वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर शिस्तबद्ध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार व प्राणीजन्म नियंत्रण (ABC) नियम, २०२३ अन्वये शिरुर नगरपरिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र निवारा तसेच निश्चित आहार क्षेत्र जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे.
त्याचबरोबर, कुत्र्यांना खाद्य देण्यासाठी शहरातील आठ ठिकाणे अधिकृतपणे आहार क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.





