क्राईम
Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका घेतली असून, शिरूर तालुक्यातील एका सराईत गुन्हेगारास एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
गुंजाळ याच्याविरुद्ध अवैध अग्निशस्त्र बाळगणे, घातक हत्यारांनी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी अशा स्वरूपाचे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी गुंजाळ यास एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचेही या कारवाईत सहकार्य लाभले.पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, शिरुर पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, पो. हवा मंगेश थिगळे, तुषार पंदारे, संजय जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, सहा. पो फौजदार शरद गावडे, पो.हवा परशराम सांगळे, पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, गणेश गोसावी, विजय शिंदे, निखील रावडे, अंबादास थोरे, निरज पिसाळ, रघुनाथ हळनोर, आदीनी या कारवाईत सहभाग घेतला.