महाराष्ट्रराजकीयस्थानिक
शिरूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ११ नगरसेवक, भाजपचे मोठे यश : राहुल बाबुराव पाचर्णे
भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या ओन्ली वूमन्स जिम शिरूरच्या वतीने सत्कार


शिरूर -{डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार ओन्ली वूमन्स जिम शिरूर व भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सुनीता आनंद भुजबळ, संतोष थेऊरकर, सुनीता कुरुंदळे , सागर नरवडे, पूजा पोटावळे, अमित कर्डीले, स्वीटी शिंदे, उमेश शेळके, रिंकू जगताप, या नगरसेवकांच्या सत्कार भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपच्या पदाधिकारी रेश्मा शेख, पुष्कराज पोटावळे, अनिल पोटावळे, शरद पाचर्णे,आनंद भुजबळ, आदी उपस्थित होते.
राहुल पाचर्णे म्हणाले की भाजपाचे कार्यकर्ते जिद्दीने व ताकदीने निवडणुकीस सामोरे गेले व ११ भाजपचे नगरसेवक झाले. पक्षाला मोठे यश या निवडणुकीत मिळाले आहे.
सर्वात जास्त नगरसेवक भाजपाचे या निवडणुकीत निवडून आले. राज्यात व केंद्रात पक्षाचे शासन असून विविध विकासकामे मार्गी लावण्यात येईल असे पाचर्णे म्हणाले.भाजपच्या नगराध्यक्ष् पदाच्या उमेदवार माजी नगराध्यक्ष सुवर्णा लोळगे यांचे मार्गदर्शन ही वेळोवेळी घेण्यात येईल असे ते म्हणाले.


यावेळी नगरसेवक सागर नरवडे, उमेश शेळके, अमित कर्डीले, सुनीता भुजबळ, सुनिता कुरुंदळे, पूजा पोटा वळे, स्वीटी शिंदे, नगरसेवक संतोष थेऊरकर आदीनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिया बिरादार यांनी केले.सूत्रसंचालन सुजाता पाटील यांनी केले.आभार नगरसेविका रिंकू जगताप यांनी मानले.


