Uncategorizedक्राईम

अज्ञात चोरट्यानी कंपनीतील १६ लाख रु. किंमतीचा माल केला लंपास

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}

 करडे,ता. शिरूर  येथील एस. व्ही. एस. रेफकॉम प्रा. लि. कंपनीच्या युनिट नं. २ मध्ये अज्ञात चोरट्यांनी लाखोंची चोरी केली आहे. या प्रकरणी नामदेव महादु गाडेकर (वय ३७, रा. मराठानगर, केडगाव, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली असून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, दि. २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता ते दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी कंपनीच्या युनिटच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून प्रवेश करून आतमध्ये ठेवलेले कॉपर ट्युबचे ६५ बंडल चोरून नेले. प्रत्येक बंडलचे वजन २२ किलो असून एका बंडलची किंमत २५,१२४ रुपये इतकी आहे. एकूण चोरी गेलेला माल सुमारे १६ लाख ३३ हजार ६० रुपये किंमतीचा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेची नोंद शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६८३/२०२५, कलम BNS 305 प्रमाणे झाली असून पुढील तपास  पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस  उपनिरीक्षक बनकर करत आहे.डेली न्यूज पोस्ट टीम च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य चंदुलालजी बुधमलजी चोरडिया यांना 81 वाढदिवसानिमित्त डेली न्यूज पोस्ट च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button