विशेष
उद्या शुक्रवार दि . ४ एप्रिलला सकाळचा सत्रातील पाणी पुरवठा होणार नाही .
शिरुर नगरपरिषदेची माहिती
शिरुर दि . ( डेली न्यूज पोस्ट टीम ) गुरुवार दि . 3 एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजल्या पासून जलशुद्धीकरण केंद्र शिरुर येथे महावितरण कडून होणारा विद्युत पुरवठा खंडित असल्याने शिरुर नगरपरिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र बंद आहे. त्यामुळे उद्या शुक्रवार दि . ४ एप्रिलला सकाळच्या सत्रात पाणी पुरवठा होऊ शकत नाही अशी माहिती नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभागाचा वतीने देण्यात आली आहे .
सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन ही करण्यात आले आहे .