शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24) – आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., शिरूर (ता. शिरूर, जि. पुणे) या संस्थेच्या सन २०२५–२६ ते २०३०–३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ मधील नियम ३२ नुसार ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी पी. व्ही. हराळ यांनी निकाल जाहीर केला.
संस्थेच्या सर्वसाधारण सभासद प्रतिनिधी म्हणून भाऊसाहेब बबन कवाष्टे, सुभाष फकीरचंद जैन,चंद्रकांत भिमाजी निघोजकर,प्रभुलिंग रामचंद्र वळसंगे, देवल शरद शहा, सय्यद फईमअली साबीरअली ,
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून चाबुकस्वार निर्मला निवृत्ती, महिला सभासद प्रतिनिधी – सय्यद शबाना फईमअली, इतर मागास प्रवर्गातून घायतडक नीलकंठ आनंदराव, तर भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून कवितके चांगदेव मार्तंड यांची बिनविरोध निवड झाली.