राष्ट्रीयविशेषशैक्षणिक

शिरूरची मुले ठरली ‘अबॅकस’ चॅम्पियन! नॅशनल लेव्हल स्पर्धेत ९६ विद्यार्थ्यांचा सहभाग; २३ जणांना चॅम्पियन ट्रॉफी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूरच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्तेचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकावला आहे. शिरूर येथील आरुष ॲबॅकस ॲकॅडमीच्या वतीने रविवारी (दि. १ मार्च २०२६) National Level Abacus and Mental Arithmetic Competition 2026 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून तब्बल २३ विद्यार्थ्यांनी ‘चॅम्पियन ट्रॉफी’ पटकावली.

स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य बक्षीस वितरण समारंभ शिरूरच्या वूडलँड कॅफे अँड बँक्वेट हॉल येथे उत्साहात पार पडला. पालकांची मोठी उपस्थिती आणि टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

✨ निकाल ठळक वैशिष्ट्ये

🏆 २३ विद्यार्थी – चॅम्पियन ट्रॉफी विजेते

🥇 ३२ विद्यार्थी – प्रथम क्रमांक

🥈 २५ विद्यार्थी – द्वितीय क्रमांक

🥉 ४ विद्यार्थी – तृतीय क्रमांक

🎖️ ११ विद्यार्थी – चतुर्थ क्रमांक

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे पोलिस रिसर्च सेंटरचे पीएसआय डॉ. उमाकांत दंडगव्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिरूर नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. अमित कर्डीले, प्रा. डॉ. राजेंद्र पवार, प्रा. सतीश धुमाळ, , प्रा. विवेक आगाशे, प्रा. सुनिल देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

🌟 शिरूर सेंटरचे चॅम्पियन विद्यार्थी

🏆 चॅम्पियनशिप विजेते :

कु. शौर्य पवार, कु. देवांश औटी, कु. ईशान्वी व्हट्टे

 प्रथम क्रमांक :

कु. समर्थ पवार, कु. तनिष निचीत, कु. अंशिका गीते, कु. वेदांत तिकोणे, कु. तन्मय नवले, कु. वरद कर्डीले, कु. भाविक क्षीरसागर, कु. संकल्प साबळे, कु. विघ्नेश चव्हाण, कु. शिवम एरंडे, कु. ओम एरंडे, कु. कृष्णाली थोरात, कु. प्रणाली साबळे, कु. मनस्वी नाईकरे, कु. स्वरा येवले

🥈 द्वितीय क्रमांक :

कु. श्रीशा गिते, कु. आद्यश्री भोंडवे, कु. ऋग्वेद बच्छाव, कु. संस्कृती तिकोणे, कु. स्पंदन तायडे, कु. आरुष गलबले, कु. कार्तिक डाळिंबकर, कु. शनय सोमवंशी, कु. कार्तिकी डाळिंबकर, कु. अभिमन्यू वरपे, कु. स्वरा कदम, कु. शौर्य व्हट्टे, कु. नमो गांधी, कु. स्वराज घावटे, कु. आराध्य गदादे, कु. मेहजबीन तांबोळी, कु. मानस मेंगाने

🥉 तृतीय क्रमांक :

कु. वेदिका सपकळ, कु. नितिशा कोलते

🎖️ चतुर्थ क्रमांक :

कु. मनस्वी नवले

📚 विविध सेंटरचा सहभाग

या स्पर्धेत कोल्हार सेंटर (अहिल्यानगर), मोरगाव सेंटर (बारामती, पुणे), न्हावरा सेंटर (शिरूर) आणि शिरूर सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲकॅडमीच्या डायरेक्टर सौ. तनुजा मेंगाने पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. चंद्रभान मेंगाने पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे सौ. तनुजा मेंगाने पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे पालकांनी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावर शिरूरच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे शहराच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवा मानाचा तुरा लाभला आहे. 🏅✨

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button