Uncategorizedराष्ट्रीय
Related Articles
माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन
22 hours ago
Check Also
Close
शिरूर( डेली न्यूज पोस्ट टीम ) येथील डेक्कन स्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या संधींचा विचार करता मुलांना जर्मन भाषेचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
त्यामुळेच डेक्कन स्कूल मधील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी जर्मन भाषा मूलभूत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गरवारे महाविद्यालयातील जर्मन भाषेच्या विद्यार्थिनी समृद्धी संतोष शेळके या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देणार आहेत.
या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन डेक्कन स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक श्री सखाराम पुरी यांनी जर्मन भाषा प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले तसेच जागतिक स्तरावर जर्मन भाषेचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
