विशेष
इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यातच खरे समाधान’
उद्योजिक वर्षा काळे यांच्या मनशांती छात्रालय व माहेर संस्थेतील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}’वाढदिवस म्हणजे केवळ बॅनरबाजी, फ्लेक्स आणि दिखाऊ खर्च नसून समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यातच खरे समाधान असते, अशी भावना उद्योजिका व माजी सरपंच वर्षा काळे यांनी व्यक्त केली.
वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत वर्षा काळे यांनी पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालयातील विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा केला. यावेळी छात्रालयातील विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यांना आंबरस व मिठाईचे वाटप करून आनंदाचे क्षण वाटण्यात आले. रामलिंग रोड परिसरातील माहेर संस्थेतील मुलांनाही मिठाईचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सदस्य आबासाहेब सरोदे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया,
माजी सरपंच विठ्ठल घावटे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, माजी सैनिक फक्कडराव काळे, उद्योजक शुभम काळे, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे राजू शेख,संजय पोटावळे, राहुल पोटावळे, गणेश सटाले, विवेक पाडळे, चंद्रकांत. कानिगध्वज, अमोल वाघमारे, संतोष झांबर,हुसेन शहा, निलेश नवले, मनशांती छात्रालयच्या सीमा सपकाळ, सचिन ढोरमले, शाहीर जालिंधर कुरुंदळे

यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वर्षा काळे म्हणाल्या, “आपल्याकडे किती पैसा किंवा संपत्ती आहे, यापेक्षा आपल्या कृतीमुळे किती जणांच्या आयुष्यात आनंद निर्माण होतो हे अधिक महत्त्वाचे आहे. समाजातील गरजू, निराधार आणि आधाराच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”
बदलत्या काळात युवकांनी नव्या संधी ओळखून उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. विशेष म्हणजे, मागील वर्षीदेखील वाढदिवसानिमित्त वर्षा काळे यांनी मनशांती छात्रालयाच्या इमारत बांधकामासाठी आर्थिक मदत दिली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंधर कुरुंदळे यांनी केले, तर आभार सचिन ढोरमले यांनी मानले.

