समर्थ नेतृत्व : प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल
६१ व्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनपर विशेष लेख

आपल्या कार्याने , स्वभावाने ,दातृत्वाने व कर्तृत्वाने सर्वांना आपलेसे करणारे , सर्वांशी स्नेहाने , प्रेमाने संवाद साधणारे , अर्थकारण , समाजकारण , राजकारण या सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणारे शिरुरकरांसह सर्वसामान्याचे आधारवड असणारे प्रसिध्द उद्योगपती प्रकाशजी रसिकलाल धारीवाल हे ७ मार्च २०२५ रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना हर्दिक शुभेच्छा .
आपल्या कष्ट करण्याच्या गुणाने विचारशक्ती व प्रगल्भतेने प्रकाश रसिकलाल धारीवाल यांनी उद्योग व्यवसायात स्वंत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे .
प्रकाश धारीवाल ते प्रसिध्द उद्योजक प्रकाश धारीवाल असा त्याच्या प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे .
आपला व्यवसाय देश , विदेशात वाढवत असताना व उत्तुंग व्यवसायिक यश मिळविताना त्यांनी सामाजिक कार्यात ही मोठ्या सहभाग घेत सामाजिक कार्यात ठसा उमटविला आहे . गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक मदत , दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा छावण्या , पिण्याचा पाण्याचे टॅकरद्वारे विविध भागात पाणीपुरवठा , कोरोना काळात अनेकांसाठी घरपोच टिफीन दवारे जेवण देण्याचे काम असो अथवा जळगाव येथील दीपस्तंभ फाउडैशनचा कामासाठी दिलेली मदत , गरजूना वैद्यकीय उपचारासाठी मदत असो प्रकाश धारीवाल आपली सामाजिक बांधिलकी पार पाडण्यासाठी सतत पुढे असतात .
प्रसिध्द उद्योगपती रसिकलाल धारीवाल व मातोश्री कमलबाई धारीवाल व आजी मातोश्री मदनबाई माणिकचंद धारीवाल यांच्या संस्कारात प्रकाशजी धारीवाल यांची जडणघडण झाली . बालपणापासूनच त्यांना उद्योग आणि व्यवसायाची आवड असून मित्रांच्या गोतावळ्यात राहायला आवडते .
परिश्रम , मेहनत व नावीन्यतेचा ध्यास लहानपणापासुनच प्रकाश धारीवाल यांच्याकडे आहे . आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले .
आपल्या मेहनत व सचोटीच्या गुणाने उद्योग व्यवसायात यशाची उत्तुंग भरारी घेतली .
यशाकडे मार्गाक्रमण करत असताना अडचणी अडथळे आले तरी ते डगमले नाहीत .अडचणी व समस्यांना प्रेरणा बनवत आपल्या यशाचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला . प्रामाणिकता , सचोटी, जिद्द व सयंम व गुणवत्तेचा आग्रह यामुळे प्रकाश धारीवाल नावाचा उद्योग क्षेत्रात गुणवत्तेचा स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण झाला आहे .
जे करायचे ते उत्तम आणि दर्जेदार हा त्याच्या शिरस्ता आहे . त्याचे प्रत्येक उत्पादन त्यांची साक्ष देते . उत्पादन कोणतेही असु दे ते ‘एवन दर्जाचे ‘ असेल यांची ते दक्षता घेतात .
इंडिफेस्ट या नावाने त्यांनी फूड इंडस्ट्रीज मध्ये पदार्पण केले आहे . त्याद्ववारे इन्सन्ट विविध नाष्टाचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाले आहे . उपमा , पोहे , इडली , डोसे , गुलाबजाम , ढोकला अश्या विविध पदार्थांच्या त्यात समावेश आहे .
कमालीचा साधेपणा , नम्रता , मृदू स्वभाव , सामाजिक बांधिलकी .गरीबांविषयी कणव , सह्र्दयीपणा , सर्वांविषयी प्रेम आपुलकी सद्भभाव व कामाप्रति निष्ठा , समर्पण या त्यांच्या गुण वौशिष्ट्यामुळे उद्योग जगतात त्याचे नाव आदराने घेतले जाते . योग्य दिशा, सातत्यपूर्ण कष्ट, आणि सयंम धैर्याने आपण यशाला गवसणी घालू शकता हे प्रकाशजी धारीवाल यांच्या वाटचाली कडे पाहिले की समजून येते .
जागतिक किर्तीचे उद्योजक असून ही प्रकाशजी धारीवाल अत्यंत नम्र आहे . आपले गाव , गावाकडील माणसे यांच्या विषयी प्रचंड जिव्हाळा व प्रेम आहे .
शिरुर शहरातील विविध धार्मिक कार्यक्रमात त्याच्या सक्रिय सहभाग असतो . स्वर्गिय रसिकलालजी धारीवाल यांनी सुरु केलेल्या रामलिंग महाराज पालखी सोहळ्यास नूकतीच ५० वर्षे झाली . कै . रसिकलालजी धारीवाल यांच्या निधनानंतर श्री. रामलिंग महाराज मंदिर देवस्थान , रामलिंग महाराज यात्रा सोहळा यांची जबाबदारी प्रकाश धारीवाल यांच्या खांद्यावर आल्यावर ती समर्थपणे ते पेलत आहे . रामलिंग महाराज पालखी सोहळ्यात त्याच्या सहभाग असतो . पालखीच्या दिवशी संपुर्ण शहरात ते पूर्णवेळ पालखी सोबत असतात आणि पालखी सोहळा शिरुर मधुन रामलिंग मंदिराकडे रवाना होतो त्यावेळेस ते स्वंत : पायी पालखी सोबत रामलिंग मंदिराकडे जातात . व दर्शन रांगेत थांबुन रामलिंग मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतात . प्रकाशजी धारीवाल हे प्रभू रामलिंग महाराज यांचे निस्सीम भक्त आहेत .
स्वर्गिय रसिकलाल धारीवाल यांच्या दानशूरतेचा , सामाजिक बांधिलकीतेचा , माणूसकीचा , मानवसेवेचा वारसा समर्थपणे प्रकाश धारीवाल पुढे नेत असून त्यांच्या या कामात पत्नी दीनाभाभी धारीवाल , सुपुत्र उद्योजक आदित्य धारीवाल यांचीही साथ महत्वाची आहे .
प्रकाशजी धारीवाल यांची कन्या साक्षी यांच्या नुकत्याच विवाह सोहळा पार पडला . या शाही सोहळ्यात प्रकाश धारीवाल यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण दिली. त्याच बरोबर शिरुर शहरातील सर्व नागरिकांना व आपले मूळ गाव असणारे गणेगाव ग्रामस्थ या सर्वाना प्रेमाने निमंत्रण दिले व भोजन सोहळ्याचे ही आयोजन केले . भव्य असा सेट , विद्युत रोषणाई , संगीत मैफल , चित्रपट तारक तारिकांची मांदियाळी , उद्योजक ,व्यवसायिक राजकारणी सेलेब्रेटी व शिरुरकरांच्या उपस्थितीत हा देखण्या राजेशाही विवाह सोहळा पुणे येथे संपन्न झाला .
उद्योजक म्हणून मोठे यश संपादलेले प्रकाशजी यांनी शिरुरवरील स्नेह व प्रेमामुळे शिरुर नगरपरिषदेचे नेतृत्व केले . सभागृह नेता , नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष अश्या विविध जबाबदा-या पार पाडत शिरुरच्या चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला . शिरुर नगरपरिषदेची उभी असलेली अत्याधुनिक सोयी सुविधा असणारी नवीन नगरपालिका इमारत , शिरुर शहराला थेट चिंचणी धरणातून पिण्याचा पाण्याची योजना , भूमिगत गटार योजना , विविध रस्त्यांची कामे असे एक ना अनेक विकासकामे प्रकाशभाउच्या मार्गदर्शन दूरदृष्टी व पाठपुरावामुळे मार्गी लागले आहेत .
पुणे व अहिल्यानगर या दोन शहरातील शिरुर हे महत्वाचे शहर बनू पाहत आहे रांजणगाव एमआयडीसी , सुपा एमआयडीसी , नव्याने विकसित होत असलेली कर्डे एमआयडीसी , त्याच बरोबर प्रस्तावित पुणे शिरुर शिर्डी नाशिक असा होणारा रेल्वेमार्ग , नियोजित पुणे संभाजीनगर तीनमजली रस्ता , सोलापूर मुंबई महामार्ग यामुळे महामार्गाचे विणले जाणारे जाळे यातून शिरुरचे चित्र बदलणार असून या बदलत्या शिरुरची आधिक प्रगती होण्याकामी प्रकाशजी धारीवाल यांचे समर्थ नेतृत्व मोठे काम करेल हा विश्वास समस्त शिरुरकरांना आहे .
प्रकाशजी रसिकलालजी धारीवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .