धार्मिंक

श्री स्वामी समर्थ सेवा संस्था मंदिर   वर्धापन दिन निमित्ताने धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन

शुक्रवार दिनांक २३ जानेवारी रोजी सायंकाळी महाप्रसाद

शिरूर  { डेली न्यूज पोस्ट टीम 24} प्रीतम प्रकाश नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा संस्था मंदिर  वर्धापनदिन उत्सव शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. वर्धापनदिनानिमित्त व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.उत्सवाच्या दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत  रुद्राभिषेक होणार असून, त्यानंतर सकाळी ९.३० ते १० या वेळेत श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करण्यात येईल. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत महाआरती व त्यानंतर ८ ते ९ या वेळेत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमांना शिरूर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button