
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर करांशी विशेष स्नेह जपणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधना नंतर शिरूरकरांच्या भावना अनावर झाल्या.त्यांना आदरांजली वाहताना अनेकांच्या अश्रूच्या बांध फुटला.
शिरूर तालुक्याच्या विविध विकास कामांची पायाभरणी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. काही महिन्यापूर्वी झालेल्या शिरूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने अजित दादा पवार हे शिरूर येथे जाहीर सभेच्या निमित्ताने आले होते ही शिरूर मधील त्यांची अखेरची सभा असेल याची कल्पना त्यावेळेस कोणास नव्हती.
शिरूरच्या विकासाचा रोड मॅप आपल्या सभेत त्यांनी भाषणाद्वारे मांडला. शिरूरच्या नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ही आली व नगराध्यक्ष म्हणून ऐश्वर्या पाचरणे याही निवडून आल्या. शिरूर शहराच्या विविध विकास कामांच्या संदर्भामध्ये अजितदादा पवार यांनी लक्ष घातले होते साहजिकच अजितदादांच्या अचानक झालेल्या एक्झिट मुळे शिरूरच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
. शिरूर शहर परिसरातील विविध शाळांमधून ही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली.कापड बाजार मधील पाचकंदील चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अजितदादांच्या निधनाने अनेक कार्यकर्त्यांना त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले होते.
