विशेषशैक्षणिक

शिरूरकरांना शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी दुर्बिणीच्या साह्याने आकाशातील ग्रहताऱ्यांचे निरीक्षण करण्याची संधी 

शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम 24}चांदमल ताऱाचंद बोरा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शिरूर (जि. पुणे) येथील भौतिकशास्त्र आणि  (बी.व्होक रिन्यूएल एनर्जी ) विभागाच्या वतीने ‘आकाशदर्शन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “अंतरिक्षप्रवास : ताऱ्यांची मोहक दुनिया” या विषयावर आधारित हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५ ते ८ या वेळेत बोरा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.

या उपक्रमात विद्यार्थ्यांसह नागरिकांना दुर्बिणीच्या सहाय्याने आकाशातील तारे, ग्रह व विविध खगोलीय घटकांचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यात येणार आहे. अंतराळ विज्ञानाविषयी जिज्ञासा वाढविणे, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे आणि खगोलशास्त्राची आवड निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्राचार्य डॉ. के . सी. मोहिते यांनी सांगितले.याप्रसंगी शहरातील विविध शाळांमधील 500 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणारे आहेत. पुणे येथील प्रसिद्ध आयुका संस्थेमधील चार खगोलशास्त्रज्ञ या आकाश दर्शनासाठी येणार असून साधारण सहा ते सात टेलिस्कोप द्वारे ग्रहताऱ्यांचे दर्शन घडवणार आहेत. उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य एच. एस.जाधव व नोडल अधिकारी प्रा. डॉ. डी.एच. बोबडे मार्गदर्शन करणार आहेत.या आकाशदर्शन कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी व विज्ञानप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button