महाराष्ट्र
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहर व ग्रामीण परिसरात दरवर्षी मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संभाव्य भारनियमनाबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भूमीपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत उपकार्यकारी अभियंता, महावितरण शिरूर यांना निवेदन देण्यात आले.











