क्राईम
दरोडेखोरांच्या मारहाणीत दोन महिला जखमी .१लाख ७४ हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोरले .
शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४) आंबळे , ता . शिरुर येथे पडलेल्या दरोड्यात दोन ज्येष्ठ्य महिला जखमी झाल्या असून दरोडेखोरांनी १ ६० लाख हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत .
सौ .कल्पना प्रताप निंबाळकर वय ६० वर्षे व रत्नाबाई शितोळे दोघे ही राहणार – आंबळे , ता . शिरुर , जि- पुणे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत .
यासंदर्भात कल्पना प्रताप निंबाळकर वय -६० वर्षे , राहणार -आंबळे, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांनी ६ अनोळखी इसम वय अंदाजे २० ते २५ यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
६ जुलै रोजी कल्पना निंबाळकर यांच्या घरात रात्री मराठी बोलणारे व अंगाने सडपातळ असणारे २० ते २५ वर्ष वयोगटातील ६ अनोळखी चोरटे आले . त्यांनी हातातील दांडक्याने कल्पना निंबाळकर व रत्नाबाई शितोळे यांना मारहाण करून दोघींचे गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून दरोडा करून चोरून नेले .
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजले
यांनी भेट दिली . आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे .


