Uncategorized
शिरूर मध्ये महंमद पैंगबर जयंती निमित्त उत्सहात मिरवणुक

शिरूर दिनांक(डेली न्यूज पोस्ट टीम -२४) पैगंबर जयंती निमित्ताने लाटेआळी तील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून उत्साहात जुलूस (मिरवणुक) काढण्यात आली. या जुलूस मध्ये सर्वधार्मिय नागरिकांच्या सहभाग होता.

लाटेआळी तील डॉ.आंबेडकर चौकात निशानास(झेंडा ) पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आल्यावर जुलूस निघाला.
माजी नगरसेवक मंगेश खांडरे, मुन्ना आबिद शेख, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल,मनसेच्या डॉ. वैशाली साखरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप, नगरपालिकेचे अधिकारी दत्तात्रेय बर्गे, नीलेश विभुते, भूमीपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे, प्रमोद महाराज जोशी आदी यावेळी उपस्थित होते.


