क्रीडाराष्ट्रीय

इन्स्टाग्रामवर फोटो झळकला आणि गुन्हाला वाचा फुटली

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: तीने पहिले लग्न केले दुसर ही लग्न केले. दुसरा पती बरोबर लग्न झाल्यावर मुलगा ही झाला हा मुलगा सारख्या किरकिर करून रडतो व पुन्हा तिसर नवीन लग्न करायच तर लग्ना करिता मुलाचा अडथळा येऊ नये म्हणून अकरा महिन्याच्या मुलाला मारून टाकल व घर सोडून बाहेर पडली व लग्न केल. लग्न झालेल्या पती समवेतचा फोटो सोशल मीडियावरील इंस्टाग्राम वर झळकला तो अगोदरच्या नवरा ने पाहिला आणि मग आईनेच मुलाचा केलेला खूनास वाचा फुटली.व ११ महिन्याचा मुलाच्या खून प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी पूजा रवींद्र पवार वय 22 हिला अटक केली.

या संपूर्ण प्रकाराची व गुन्हाची माहिती देण्यासंदर्भात पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यानी सांगितले की भांबर्डे ता.शिरूर येथील रविंद्र अशोक पवार यानी खबर दिली होती की ८ मार्च २०२६ रोजी पवार यांच्या पत्नी पूजा या त्याच्या ११ महिन्याचा मुलगा यश यांच्या सह घरातून निघून गेल्या आहेत.
पूजा मूळच्या अहिल्यानगर येथील असून त्याचे रवींद्र पवार यांच्याशी लग्न होण्यापूर्वी श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर येथील युवकाशी लग्न झाले होते. रवींद्र यांचे ही यापूर्वी लग्न झालेले होते. पूजा यांच्या बरोबर झालेले त्याचे ही दुसरे लग्न होते.
५ मार्च ला रविंद व पूजा हे फिरण्यासाठी मुरुड याठिकाणी गेले होते. मुरुड वरून आल्यानंतर ८ मार्च रोजी पूजा ही मुलगा यश सह घरातून निघून गेली.
त्यानंतर काही दिवसांनी इन्स्टाग्रामवर पूजाचा लग्न केलेल्या पती समवेतचा फोटो रविंद्र यांनी पहिला. त्यानंतर रविंद्र यांनी पूजा हिच्याशी संपर्क साधत तुला काय करायचे आहे ते कर पण माझ्या बाळाला तू माझ्या कडे आणून दे . त्यावर बाळ माझ्या कडे सुखरूप आहे. असे सांगून तिने उडवाउडवीची उतरे दिली. त्यामुळे रवींद्र यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिली व पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद करून या प्रकरणी तपास सुरु केला.पोलिसांनी पूजा कडे यश संदर्भात चौकशी केली असता तिने सांगितले की यश हा ओट्यावरून पडून मरण पावला भीतीने मुलास एका पिशवीत भरून विहिरीत टाकले.
पोलिसांनी या संदर्भात अधिक माहिती गोळा करून सखोल तपास केल्या नंतर यश याच्या खून पूजा हिनेच केल्याचे निष्पन झाले. पूजा हिने सांगितले की यश हा नेहमी किरकिर करून रडत असतो. कोठेतरी जावून दुसरे लग्न करावे. दुसरे लग्न करताना मुलाला सोबत घेऊन गेल्यावर कोणी लग्न करणार नाही असा विचार करून तिने यश याचे डोके घरा समोरील कपडे धुण्याचा सिमेंट ओट्यावर आपटवून त्याचा खून केला. हा मृतदेह पिशवी मध्ये भरून शेतातील विहिरीत टाकून दिला. पिशवी पाण्यात बुडून राहण्यासाठी त्या पिशवीत मृतदेह सोबत दोन दगड भरून ठेवले व विहिरीतील पाण्यात मृतदेह टाकून दिला.
घटनेनंतर ती त्या परिसरातच थांबली, . दुसरा दिवशी जवळ असणारे दागिने तिने विकले. त्यानंतर काही दिवसांनी तिने पारनेर तालुक्यातील युवकाशी लग्न केले.
दरम्यान पूजा हिचा तिचा लग्न झालेल्या पती सोबतचा फोटो इन्स्टाग्राम वर झळकला आणि हा फोटो रविंद्र यांच्या पाहण्यात आल्या. त्यानंतर रवींद्र यांनी आपल्या मुलगा यश संदर्भात पूजा यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्याच्या मनात संशय निर्माण झाला आणी त्यानी पोलिसाकडे धाव घेत फिर्याद दिली. आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आईस मुलाच्या खून प्रकरणी अटक केली.
हा तपास पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, तसेच नीलकंठ तिडके, विलास आंबेकर नितीन भोस, किशोर शिवणकर, अभिमान कोळेकर, पांडुरंग साबळे, मच्छिंद्र जागृती,नीलम जाधव, नितीन दळवी यांच्या पथकाने केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button