राष्ट्रीयविशेष

कष्टकऱ्यांच्या घरातून पोलीस दलात निवड झालेल्या ; गौरी जाधव व कल्याणी जठार यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
शिक्षण हे परिवर्तनाचे साधन असून आपली परिस्थिती बदलण्याचा मुख्य आधार.
याच शिक्षणाची प्रचिती दाखवून देत येथील दोन कष्टकऱ्यांच्या घरातील मुलींनी पोलीस दलात भरती होत आपली जिद्द चिकाटी व अभ्यासाने अशक्य ते शक्य करून दाखवता येते हे दाखवून दिले आहेत.
येथील गौरी राजेंद्र जाधव व कल्याणी सुनील जठार या दोन विद्यार्थिनींनी.नुकत्याच झालेल्या पोलीस दलाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.

पोलीस दलाची भरती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गौरी जाधव यांचे अभिनंदन करताना गौरीचे वडील राजेंद्र जाधव व आई सुरेखा जाधव
पोलीस दलाची भरती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कल्याणी जठार यांचे अभिनंदन करताना कल्याणीचे वडील सुनील जठार व आई

त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. गुलाल उधळून पेढे वाटून व मिरवणूक द्वारे त्यांचे हे यश साजरे करण्यात आले.
गौरी राजेंद्र जाधव या शहरातील लाटेआळी परिसरात राहतात. गौरी यांचे वडील रिक्षा चालक असून आई या हॉस्पिटलमध्ये सहाय्यक म्हणून काम करतात. त्यांची मुलगी गौरी ही लहानपणापासूनच अभ्यासात व मैदानी खेळात अग्रेसर होती. कष्टाचा वारसा व मेहनतीचा वारसा आई-वडिलांकडून घेत तिने आपल्याला सरकारी नोकरी अथवा पोलीस दलात जायचे हे स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.तिने त्याकरिता अभ्यासिका जॉईन केली. एकीकडे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दुसरीकडे पोलीस प्रशिक्षण भरती अभ्यास केंद्र यात ही प्रवेश घेतला. भल्या पहाटे उठून धावणे व इतर व्यायाम करणे. त्यानंतर आपले महाविद्यालयीन शिक्षण व पोलीस दलात जाण्यासाठी अभ्यास तिने सुरू केला. कोणत्याही परिस्थितीत पोलीस व्हायचं ही जिद्द मनात ठेवून तिने अभ्यास केला व यश खेचून आणले तिच्या या जिद्दीला व अभ्यासाला वडील राजेंद्र व आई सुरेखा यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. निकाल जाहीर झाल्यानंतर गौरी हिची निवड झाल्याचे कळाल्यावर फटाके फोडून गुलाल उधळून मिरवणूक काढून पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. गौरी ही तिच्या घरातील पहिली सरकारी कर्मचारी बनली आहे.गौरी चे चुलते विजय जाधव व अविनाश जाधव यांनी ही गौरीचे यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

दुसरी यशाची कहाणी कष्ट व जिद्दीची
अश्या कल्याणी सुनील जठार हिची सर्वांना प्रेरणादायी अशीच आहे.
जठार परिवार यांची ही आर्थिक परिस्थिती जेमतेम. परंतु कल्याणी मध्ये जिद्द व आपण आपली परिस्थिती बदलू शकतो हा दुर्दम्य आशावाद व प्रबळ असा आत्मविश्वास होता. घरात फारसं कोणी शिकलेल नसतानाही कल्याणीने मात्र शिक्षणात गोडी दाखवत आपल्या शिक्षण प्रवास सुरू केला. कल्याणीचे ही लहानपणापासून सरकारी नोकरीत जायचं हे स्वप्न होत.हे स्वप्न कसं साकार करायच याचा विचार करुन आपल्याला पोलीस होण्याचं निश्चित केल. स्वप्न पाहिल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष दिवस रात्र अभ्यास परिश्रम मेहनत करावी लागते हे तिला माहिती होत. आपली मुलगी नक्की सरकारी नोकरी मिळवणार विश्वास कल्याणीच्या आई व वडील यांना होता त्यामुळेच त्यांनी कल्याणीच्या शिक्षणास पाठबळ दिले. कल्याणीची आई व वडील सुनील हे छोटे किराणा मालचे दुकान चालवून आपल्या प्रपंचाचा गाडा हाकतात.सुनील हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आपली लेक पोलीस झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. आमच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नव्हते माझ्या मुलीने पोलीस होऊन आमच्या कुटुंबाचा नवीन इतिहास घडविला असून माझ्या मुलीच्या कर्तुत्वाचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
गौरी जाधव व कल्याणी जठार यांचा विविध संस्था संघटनेच्या वतीने त्याचबरोबर श्रीमंत हलवाई गणेश मित्र मंडळ व छत्रपती शिवाजी गणेश मित्र मंडळ लाटेआळी या दोन्ही मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. शिवजयंती उत्सव समिती शिरूरचे अध्यक्ष रवींद्र धनक, माजी नगराध्यक्ष गुलाबशेठ धाडीवाल, राजेंद्र क्षीरसागर, बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, नगरसेवक सागर नरवडे आदीनी जाधव व जठार यांचे अभिनंदन केले आहे.
तुमची परिस्थिती कशी असेल परंतु तुमच्याकडे स्वप्न पाहण्याची ताकद असेल व हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत त्याचबरोबर अपयश आले तरी न डगमगता पुन्हा अपयशातून उभे राहण्याची क्षमता व आपले प्रयत्न सातत्याने यशासाठी करणे त्याच बरोबर आपल्या मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे आई बाप असतील तर यशाचा इतिहास तुम्ही लिहू शकता तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही हेच गौरी व कल्याणी यांनी दाखवून दिले असून या दोन्हीचे भविष्यात पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button