Uncategorizedमहाराष्ट्रराष्ट्रीयविशेष
Related Articles
Check Also
Close
-
माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन2 days ago


संस्थेकडे ३१ मार्च २०२६ अखेर सभासदांच्या ठेवी १०२ कोटी रुपये असून ७९ कोटी रुपयांचे येणे कर्ज आहे. येणे कर्जात ३५ कोटी रुपयाचे सोनेतारण व ६ कोटी रुपयांच्या ठेवतारण सारख्या अत्यंत सुरक्षित कर्जाचा ५१ टक्के समावेश आहे. सस्थेची बँक गुंतवणुक ५०.४२ कोटी इतकी असून नफ्याचे प्रमाण एकूण ठेवींच्या ४९.४३ टक्के इतके आहे.
संस्थेचे सुरक्षित कर्जाचे प्रमाण व बँक गुंतवणुकीचे आकडे अतिशय भक्कम आर्थिक स्थितीचा प्रत्यय देणारे असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे यांनी दिली.



चालू आर्थिक वर्ष हे संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने चालू आर्थिक वर्षात अनेक नव्या उपक्रमांसह सर्वोच्च उद्दिष्ट गाठण्याबरोबरच सभासद, ग्राहकांशी एक आपुलकीचे नाते निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्याचा निश्चय कार्यकारी संचालक संपतराव वाळुंज यांनी व्यक्त केला.
